दिल्ली येथे SIR (व्होट चोरी) विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उग्र आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वसई-विरार, नालासोपारा शहरात इंडिया आघाडी, महाविकास आघाडी तर्फे जनजागृती करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून *शनिवार दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता, तुळींज पोलीस स्टेशन समोरील ब्रिजच्या खाली, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांचे "पिंडदान आंदोलन"* करण्यात येणार आहे.
हा लढा जनतेला समजावा व आपल्या मतदानाच्या हक्कासाठी लढण्यास सिद्ध रहावे, यासाठी आज काँग्रेस भवन, पारनाका, वसई येथे इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेस काँग्रेस जिल्हाध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी, वरिष्ठ नेते ओनील अल्मेडा, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे, वरिष्ठ नेते विकास वर्तक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदारनाथ यादव, रतन तिवारी, किरण शिंदे, उपाध्यक्ष अश्रफ अली, रफिक शेख, अवधराज यादव, राजकुमार यादव, राकेश यादव, सुनील कुमार यादव, मनाली ताई, मोहन घरत यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेतून जनतेला आवाहन करण्यात आले की, हा लढा लोकशाही वाचवण्यासाठी आहे. उद्याच्या पिंडदान आंदोलनात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे अपील करण्यात आले.





Post a Comment
0 Comments