Type Here to Get Search Results !

*दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महापौर मॅरेथॉन २०२६ रद्द करण्याची मागणी*

 


सध्या महाराष्ट्रात अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. कमी पावसामुळे बळीराजा शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याअभावी शेतातच जळून गेले आहे. शासनाने राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.


अशा परिस्थितीत राज्याच्या व विशेषतः वसई तालुक्यातील शेतकरी वर्गास आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी आज हवालदिल झाला असून शासनाच्या व समाजाच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे.


या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले. यंदाची प्रस्तावित महापौर मॅरेथॉन - २०२६ ही स्पर्धा रद्द करण्यात यावी, असे विनम्र आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


या मॅरेथॉनवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचवून ती संपूर्ण रक्कम दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत म्हणून वितरित करण्यात यावी. हा एक संवेदनशील आणि मानवतावादी निर्णय ठरेल व वसई-विरार महानगरपालिकेचा आदर्श संपूर्ण राज्यासमोर जाईल, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली. निवेदन आयुक्त श्री.पृथ्वीराज बी.पी यांनी स्वीकारले, तेव्हा त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त श्री.दीपक सावंत उपस्थित होते.


सदर निवेदन देतेवेळी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी, वरिष्ठ नेते ओनिल अल्मेडा, प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे, कार्याध्यक्ष रतन तिवारी, उपाध्यक्ष बाबा पाटील, ब्लॉक अध्यक्ष वेल्फ्रेड डिसोझा, ब्लॉक अध्यक्ष भीमराव पेठकर, सुनील कुमार यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments