Type Here to Get Search Results !

*वसई विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित सार्वजनिक हिताच्या विषयांना गती देण्यासाठी आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक*











वसई विधानसभा मतदारसंघातील विविध सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी तसेच यासंदर्भात यापूर्वी करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेऊन त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. 734 (2026) - बैठक- जिल्हाधिकारी.pdf

बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा झाली —

* वसई तालुक्यातील गावठाण तसेच कोळीवाड्यातील घरांच्या जमिनी संबंधित धारकांच्या नावे करण्याबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत सार्वजनिक हिताच्या विविध प्रकल्पांसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये


     जिल्हा /तालुका क्रीडा संकुलासाठी जमीन, आयआयटी सुरू करण्यासाठी जागा , सत्पाळा येथील २२ के.व्ही. सब स्टेशनसाठी जमीन, धर्मादाय रुग्णालय तसेच मूल्यशिक्षण, सामुदायिक विकास व मोफत अन्नदान केंद्रासाठी जागा, मत्स्यप्रशिक्षण केंद्रासाठी जमीन या विषयांचा समावेश होता.

या बैठकीमध्ये वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील बावखळांच्या सुरक्षा व संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली.

वसई विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक हिताचे हे विषय मार्गी लागावेत आणि नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या प्रकल्पांना योग्य ती गती मिळावी, यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीसाठी वसई विधानसभेच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांच्यासह श्रीमती इंदू राणी जाखड , जिल्हाधिकारी , पालघर , श्री.सुभाष भागडे,निवासी उपजिल्हाधिकारी , पालघर, श्री. नरेंद्र पाटील , जिल्हा अधिक्षक , भूमी अभिलेख , पालघर श्री.सुहास व्हनमाने,जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर उपस्थित होते. तसेच श्री. शेखर घाडगे , उपविभागीय अधिकारी वसई , श्री. संजय हेरवाडे , अति. आयुक्त ,व.वि.श.मनपा , श्री. दिपक सावंत , अति. आयुक्त , व.वि.श. मनपा,श्री. दिपक गायकवाड , तहसीलदार , वसई हे अधिकारी ऑन लाईन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments