*काँग्रेसच्या आंदोलनाला मोठे यश, गणेशोत्सवात नागरिकांना काँग्रेसकडून आरोग्याची अनमोल भेट - पहिले सेंटर ३ महिन्यात नालासोपाऱ्यात सुरू होणार.*
वसई
आज वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत माणिकपूर वसई ब्लॉकच्या वतीने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
आंदोलनाचे ठिकाण पॅटीट हॉस्पिटल, वसई हे असताना आरोग्य विभाग प्रमुख डॉ. भक्ती चौधरी या गैरहजर असल्याने आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी यांनी थेट उपायुक्त स्वाती देशपांडे यांना फोन करून आय-प्रभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. त्यानंतर उपायुक्तांनी तातडीने मुख्यालयात चर्चा घडवून आणण्याचा व डॉ. भक्ती चौधरी यांना उपस्थित ठेवण्याचा शब्द दिला.
स्टँडिंग कमिटीची मिटिंग संपल्यानंतर उपायुक्त देशपांडे मॅडम काँग्रेसच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी उपलब्ध झाल्या.
*या चर्चेत काँग्रेसने ठामपणे खालील मागण्या मांडल्या :*
१) सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे, एमआरआय या तपासण्या नागरिकांना अत्यल्प दरात किंवा मोफत उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय धोरणानुसार शासनाने ठरवून दिलेले दरच आकारावेत.
२) ब्लड टेस्ट आणि औषधे नागरिकांना वेळेत आणि मोफत मिळावीत. महानगरपालिकेच्या केंद्रांवर औषधे उपलब्ध नसतात, त्यामुळे नागरिकांना ती बाहेरून महागात विकत घ्यावी लागतात. हा भुर्दंड वसई-विरार महानगरपालिका नागरिकांना परत करणार का, असा जाब विचारण्यात आला.
३) प्रत्येक आरोग्य केंद्रावर तक्रार निवारणासाठी ऑनलाईन सुविधा, QR कोड आणि तक्रार रजिस्टर दर्शनी भागात ठेवावे व ७ दिवसांत तक्रारीचे निवारण करून संबंधित नागरिकाला फोनवर माहिती द्यावी.
४) एक्सपायरी झालेल्या औषधांचा साठा आणि आरोग्य विभागातील संपूर्ण स्टाफची शैक्षणिक पात्रता, सर्टिफिकेट व कार्यक्षमता तपासावी.
या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन उपायुक्तांनी मोठा निर्णय जाहीर केला. *येत्या तीन महिन्यांत या योजनेतील पहिले डायग्नोस्टिक सेंटर नालासोपारा येथे सुरू करण्यात येईल.* यामुळे बाहेर ३,००० ते १०,००० रुपयांपर्यंत होणारा सिटीस्कॅनचा खर्च महानगरपालिकेच्या माध्यमातून *फक्त ९५० रुपयात* नागरिकांना मिळणार आहे. हीच या आंदोलनाची सर्वात मोठी उपलब्धी आहे.
गणेशोत्सवाच्या पवित्र काळात जनतेने दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत, काँग्रेस पक्षाने आरोग्याचा हा महत्त्वाचा मुद्दा जनता रूपी परमेश्वराच्या चरणी यशस्वीपणे अर्पण केला आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी, वरिष्ठ नेते ओनिल आल्मेडा, प्रदेश सरचिटणीस दिनेश कांबळे, कार्याध्यक्ष रतन तिवारी, माणिकपूर ब्लॉक अध्यक्ष विल्फ्रेड डिसोझा, वसई ब्लॉक अध्यक्ष प्रिन्सली गोन्साल्वेस, जिल्हा सरचिटणीस किरण शिंदे, कोषाध्यक्ष रफिक शेख, भीमराव पेटकर, राजकुमार यादव, रवीना चौधरी, प्रफुल जाधव, सुनीलकुमार यादव,राधा अय्यर,प्रवीणा चौधरी, रामदास वाघमारे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृपया प्रेस नोट फोटो सहित प्रकाशित करावी (ओनिल आल्मेडा, मा.जिल्हाधेक्ष वसई विरार जिल्हा कांग्रेस)



Post a Comment
0 Comments