Type Here to Get Search Results !

वसईच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध लोकहिताच्या प्रश्नांवर आणि प्रशासकीय दिरंगाईवर ठामपणे भूमिका मांडत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केली








पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री मा. ना. श्री. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे जिल्हा नियोजन समिती (DPDC) ची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.


 या बैठकीत वसई विधानसभेच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी वसईच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध लोकहिताच्या प्रश्नांवर आणि प्रशासकीय दिरंगाईवर ठामपणे भूमिका मांडत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.


बैठकीत मांडण्यात आलेले प्रमुख मुद्दे आणि मागण्या:


• वीज व्यवस्था आणि ट्रान्सफॉर्मर जागेचा प्रश्न: वसईतील वाढत्या वीज मागणीचा विचार करून ३१५ केव्ही क्षमतेचे ४० नवीन ट्रान्सफॉर्मर तसेच १०० ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतावाढीसाठी (Augmentation) सुमारे ₹२५.९२ कोटींचा निधी मंजूर करावा. तसेच, महापालिका हद्दीत UDCPR नियमानुसार ट्रान्सफॉर्मरसाठी जागा न दिलेल्या विकासकांवर कायदेशीर कारवाई करावी . तसेच सत्पाळे येथील २२ के.व्ही. उपकेंद्राच्या प्रलंबित प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्यावा.


• नवघर येथील १०० बेडचे रुग्णालय: रुग्णालयाच्या प्रशासकीय मान्यतेचा आणि निधीचा प्रस्ताव उपसंचालक, आरोग्य सेवा (मुंबई मंडळ) यांच्याकडे मागील अडीच महिन्यांपासून प्रलंबित आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवून तत्परतेने मान्यता मिळवून द्यावी.


• खारफुटी (कांदळवन) स्थलांतर व पूर नियंत्रण: नायगाव येथील मुख्य नाल्याच्या तोंडावर वाढलेल्या कांदळवनाचे स्थलांतर करण्यासाठी महापालिकेने वन विभागाकडे अद्याप प्रस्ताव पाठवलेला नाही. या प्रशासकीय दिरंगाईमुळे ५ ते ८ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत संपूर्ण वसई जलमय झाली .


• व्यापाऱ्यांना नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई-विरारमधील नागरिक, दुकानदार व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चालू शासन निर्णयानुसार व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने, याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा.


• ग्रामीण विकास व पायाभूत सुविधा: वसई तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रासाठी आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित करावी,

 बावखळ संवर्धन प्रकल्पाला DPDC मधून निधी द्यावा, आणि वसई-नवघर एस.टी. डेपोच्या रखडलेल्या प्रस्तावाला गती द्यावी.


• शिक्षण व पाणी पुरवठा: कामण परिसरात ज्युनियर कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज पूर्ण करावी. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मा . पालक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक आयोजित करावी.


 आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी वसईतील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा, सक्षम वीज व्यवस्था, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर सातत्याने वस्तुनिष्ठ पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.


 बैठकीला माझ्यासह खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा, विधान परिषद आमदार श्री. निरंजन डावखरे, श्री. रविंद्र फाटक, श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, पालघरचे आमदार श्री. राजेंद्र गावित, विक्रमगडचे आमदार श्री. हरिश्चंद्र भोये, डहाणूचे आमदार श्री. विनोद निकोले, बोईसरचे आमदार श्री. विलास तरे, भिवंडी ग्रामीणचे आमदार श्री. शांताराम मोरे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखर, वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments