Type Here to Get Search Results !

वसईतील वाहतूक कोंडी आणि वाहतुकीशी संबंधित समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वसई विधान सभेच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक पोलीस , वसईतील पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्यासह बैठकझाली




* महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची 



बैठक शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी वसई - विरार शहर महानगर पालिकेच्या मुख्यालयात संपन्न झाली.*

वसईतील वाहतूक कोंडीचा अत्यंत जटील आणि मागील कित्येक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला असून, महानगर पालिका क्षेत्रातील एस.टी. डेपोंच्या जागेचा पीपीपी तत्वावर विकास करून तेथे पे अँड पार्क व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे हा ज्वलंत प्रश्न निकाली निघणार आहे.

तथापि , दरम्यानच्या काळात अपुरी आणि कालबाह्य सिग्नल व्यवस्था , पुरेसे स्पीडब्रेकर नसणे, झेब्रा क्रॉसिंग नसणे यामुळे नागरिकांना विशेषतः वयोवृद्ध जेष्ठ नागरिक , महिला , विद्यार्थी यांना दररोजच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी आज सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली.



          या बैठकीमध्ये महानगर पालिका क्षेत्रातील बऱ्याचशा मुख्य रस्त्यावर पुरेसे स्पीड ब्रेकर नसल्याचे तसेच अस्तित्वात असलेल्या स्पीड ब्रेकर वर सफेद रंगांचे पट्टे नसल्याने त्यावर वाहने आदळत असल्याचे त्याचप्रमाणे मुख्य चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने नागरिकांना रस्ता क्रॉस करताना येणाऱ्या अडचणीची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली.यावर याबाबत त्वरीत पाहणी करून या मुद्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे या अधिकाऱ्यांनी आश्वासित केले.

       


या चर्चेमध्ये रस्यांच्या कडेला बंद स्थितीत उभी असलेली वाहने , काही विशिष्ट दुकांनांसमोर नियमबाहय व अस्ताव्यस्त पार्क करण्यात येणारी वाहने यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांना रहदारीमध्ये येणारी अडचणसुद्धा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. या अनुषंगाने रस्त्याच्या कडेली उभी असलेली वाहने तात्काळ हटविण्यात येतील तसेच दिवसातील विशिष्ट वेळा रस्त्याच्या कडेला पार्किंगचे नियोजन करून तसे फलक लवकरच लावण्यात येतील असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 



           रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाले - हातगाड्या सुद्धा वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याने लवकरात लवकर फेरीवाला धोरण निश्चित करण्याचे व तोपर्यंत बेकायदा फेरीवाल्यांवर परिणामकारक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.



सदरहू बैठकीस वसई विधानसभेच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित, वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. दिपक सावंत, मीरा भाईंदर वसई विरार सहायक पोलिस आयुक्त वाहतूक श्री. शंकर इंदलकर, विरार वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. महेश शेट्ये, वसई वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत लांगी, नायगाव पोलिस ठाणे सहा पोलिस निरीक्षक श्री. यशपाल सूर्यवंशी, माणिकपूर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हरिलाल जाधव, वसई पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळकृष्ण घाडीगांवकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई श्री. अतुल आदे, सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई श्री. दिपक उगले, वसई विरार शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री.प्रदीप पाचंगे, विद्युत प्र कार्यकारी अभियंता श्री. अमोल जाधव, भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री. बिजेंद्र कुमार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments