पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत बहुजन विकास आघाडीचे सोपारा गावातील प्रमुख कार्यकर्ते, सेवन आर्ट ग्रुप व सोपारा मित्र मंडळाचे प्रमुख श्री. मोहक पाटील व त्यांचे सहकारी, सचिन देसाई, नितीन देसाई, निवास रहाटे, हितेश पाटील,हितेश निर्मल,जितेंद्र मेहता,रोहित गोडाम्बे,अक्षय देसाई, व समर्थक अश्या जवळपास 40 हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपा वसई विरार जिल्हा अध्यक्ष सौ. प्रज्ञा पाटील, जेष्ठ नेते जोगेंद्र प्रसाद चौबे, मनोज पाटील, जिल्हा महासचिव मनोज बारोट व भूषण किणी शहर अध्यक्ष सतीश सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, यावेळी त्यांचे स्वागत करताना भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून सर्वांना सन्मान व संधी दिली जाईल असा विश्वास जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील तसेच नेते मनोज पाटील यांनी व्यक्त केला.



Post a Comment
0 Comments