Type Here to Get Search Results !

मैत्रेय बुध्द विहार विरार येथे कठीण चिवरदान सोहळा संपन्न






मैत्रेय बुद्ध विरार विराट नगर विरार पश्चिम येथे भिक्खू संघाच्या उपस्थितीत भन्ते पियोलोक यांच्या पहिल्या वर्षावास समाप्ती आणि कठीण चिवरदान सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. 

    मैत्रेय बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष आयु अजीव यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 13 वर्षांपासून तथागत बुद्ध जयंती, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, तसेच पौर्णिमा अमावस्या अष्टमी उपोसथ दिन आणि विहार वर्धापनदिन तसेच सर्व महापुरुषांच्या जयंत्या आणि स्मृतीदिन साजरे केले जातात.

बुद्ध धम्म संघ विनयानुसार आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा तीन महिने वर्षावास कालखंडात एकाच ठिकाणी विहारात राहून भिक्खूनी धम्माचे चिंतन मनन करणे तसेच उपासकांना धम्म समजावून सांगणे आवश्यक असते. आणि वर्षावास समाप्तीनंतर एक महिण्यात कठीण चिवरदान सोहळ्याद्वारे उपासक उपासिका यांनी मिळून भिक्खू संघास कठीण चिवरदान अर्पण करणे हे धम्म परंपरेला अनुकूल असते.

  यावर्षी पुज्य भन्ते पियोलोक यांचा महाराष्ट्रातील पहिला तर मैत्रेय बुद्ध विहारातील 13 वा वर्षावास सोहळा होता. यापूर्वी पुज्य भन्ते सारिपूत्त थेरो, पुज्य भन्ते सुबोधीलंकार थेरो, पुज्य भन्ते लोकज्योती थेरो आणि इतर पुजानीय भिकखू संघाच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास सोहळे संपन्न झालेत.

यावर्षी 13 वा कठीण चिवरदान सोहळा दि 12 ऑक्टोबर 2025 रोजी पुजानीय भिक्खू अनिरुद्ध महाथेरो, पुज्य भिक्खू सुवण्ण थेरो, पुज्य भिक्खू कल्याणपियो, पुज्य भिक्खू सुदस्सि,पुज्य भिक्खू संपन्नो,पुज्य भिक्खू संपन्नो, श्रामनेर धम्मज्योती,यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विरार, नालासोपारा, वसई तसेच सफाळे,पालघर,डहाणू,वानगाव, बोईसर तसेच कांदिवली मालाड परिसरातील उपासक उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments