वसई विधानसभेच्या आमदार संघर्षकन्या सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मानीय मा.ना. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रालयात भेट घेऊन चिंचोटी-भिवंडी रस्त्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती सुरू करण्याबाबत चर्चा होऊन मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना पुढील दोन दिवसांत काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले. तसेच, रस्त्याची पुनर्बांधणी काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने, आवश्यक परवानग्या मिळवून प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले.
या सकारात्मक निर्णयासाठी वसई विधानसभेच्या आमदार सौ.स्नेहा ताई दुबे पंडित यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, वसईच्या नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी सातत्याने संपर्कात राहून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीस भाजपा वसई-विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजू म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस श्री. बिजेंद्र कुमार, मंडळ अध्यक्ष श्री. सूर्यकांत वाघमारे, श्री. संदीप पाटील व सर्व अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments