Type Here to Get Search Results !

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित वितरित करा-खासदार डॉ. हेमंत सवरा यांची मागणी.

 





पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्र सरकारच्या माध्यमिक पश्चात शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या वाट्याचे ₹४२.४५ कोटी इतके शिष्यवृत्तीचे अनुदान लवकरात लवकर वितरित करण्याची विनंती केली आहे.


या संदर्भात डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री मा.श्री. जुएल ओराम यांना निवेदन सादर केले. या निवेदनात संबंधित विभागास निधी तत्काळ वितरित करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.


महाराष्ट्र शासनाने वित्तीय वर्ष २०२५-२६ साठी शिष्यवृत्ती योजनेसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आधीच सादर केला आहे. यामध्ये:

वर्ष २०२५-२६ साठी ₹२८.०५ कोटी (केंद्र हिस्सा ७५%)

वर्ष २०२४-२५ साठी ₹१४.४० कोटी थकबाकी


असा एकूण ₹४२.४५ कोटींचा निधी केंद्र सरकारकडून अद्याप मिळालेला नाही.


खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, हा निधी तात्काळ वितरित झाल्यास हजारो आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही व त्यांना आवश्यक आर्थिक मदत वेळेवर मिळू शकेल.

- खासदार जनसंपर्क कार्यालय, पालघर

Post a Comment

0 Comments