Type Here to Get Search Results !

वसई आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते नविन भूमिगत २२ के.व्ही. वाहिनीचे लोकार्पण


 वसईत विजेच्या पायाभूत सुविधांना मोठा वेग –वसई विधानसभेच्या आमदार संघर्षकन्या सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते नविन भूमिगत २२ के.व्ही. वाहिनीचे लोकार्पण

२२०/२२ के.व्ही. नालासोपारा उपकेंद्र ते २२ के.व्ही. पोमण स्विचिंग स्टेशन, पोमण इनकमर-२ या नविन भुमिगत २२ के.व्ही. वाहिणीचे उद्घाटन आज गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी वसई विधानसभेच्या आमदार संघर्षकन्या सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या शुभहस्ते पोमण स्विचिंग स्टेशन, रॉयल हब इंडस्ट्रीज, पोमण ता. वसई येथे संपन्न झाले.

    या लोकार्पणामुळे वसई विरार परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम, स्थिर व अखंड राहणार असून उद्योग क्षेत्रासोबतच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या सोहळ्याला महावितरण कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता श्री.चंद्रमणी मिश्रा,महावितरण वसई मंडळ अधिक्षक अभियंता श्री. संजय सु. खंडारे, कार्यकारी अभियंता श्री. प्रविण सूटे, अती. कार्यकारी अभियंता श्री. मुकुंद देशमुख, कनिष्ठ अभियंता श्री. इरफान शेख, पोमण ग्रामपंचायत सरपंच श्री. आत्माराम ठाकरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजू म्हात्रे, वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री. उदय शेट्टी, वसई पूर्व वालीव मंडळ अध्यक्ष श्री. सूर्यकांत वाघमारे,श्री. संदीप पाटील,शिवसेनेचे शशी म्हात्रे, श्री. मयंक शेठ, श्री. मुकुंद मुळ्ये, श्री. मयुर नाईक,श्री.प्रवेश दुबे, श्री. प्रकाश देवळेकर, श्री. सुनील मिश्रा,श्री.जीत सिंग,श्रमजीवी संघटनेचे श्री. हेमंत बात्रा 

तसेच स्थानिक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments