विरार : नालासोपारा-132 विधानसभा मतदारसंघाचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्या वॉर्ड क्रमांक 30 मधील प्रचाराचा शुभारंभ 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आला. विरार-पिंपळवाडी येथील जीवदानी देवी मंदिर, मातृछाया इमारत या ठिकाणी झालेल्या या शुभारंभ प्रसंगी बहुजन विकास आघाडीचे संघटक-सचिव तथा माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील, प्रशांत राऊत, माजी सभापती प्रभाग समिती ‘ब` चिरायू चौधरी, माजी महिला बालकल्याण सभापती माया चौधरी, वसई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आनंद वडे, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल वर्तक, संजय दादा राऊत, वसंत चौधरी, बहुजन विकास आघाडी विभागीय कमिती पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील आणि संघटक-सचिव अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार क्षितिज ठाकूर यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याची सुरुवात वॉर्ड क्रमांक 30 मधून करण्यात आलेली आहे. आमदार क्षितिज ठाकूर हे याआधी तीन टर्म आमदार राहिलेले आहेत. या वेळी चौथ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. उच्चविद्याविभूषित व सामान्य जनतेत राहणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.
***

Post a Comment
0 Comments