Type Here to Get Search Results !

भाजपाई मोदी सरकारने केलेल्या साखर दूधाच्या कृत्रिम दरवाढी विरुद्ध काँग्रेस आक्रमक

 




महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ जी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माणिकपूर ब्लॉक अध्यक्ष विल्फ्रेड डिसुझा यांनी प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे, काँग्रेस नेते ओनील अल्मेडा, जिल्हा सरचिटणीस किरण शिंदे यांचे उपस्थितीत भाजपा मोदी सरकारने केलेल्या साखर व दुधाच्या कृत्रिम दरवाढी विरुद्ध वसई स्टेशन येथिल एसटी डेपो समोर धरणे आंदोलन केले.जननायक नेताप्रतिपक्ष राहुल गांधी यांनी भाजपा मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेला आर्थिक सुनामीचा सामना करावा लागेल.महागाई शिगेला पोहचेल व जनता त्यात पिळून जाईल हे सत्य आता समोर येत आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व भाजपा मोदी सरकारच्या सर्वसामान्य जनतेच्या पाकेटमार धोरणा मुळे जनतेवर एकट्या साखरेमुळे १८ हजार कोटी रु. चा बोजा पडणार आहे. हा बोजा आताची ₹३० प्रति किलो झालेली भाव वाढ घेऊन  . ह्या पुढे मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारने सवलत दिली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.(वसई विरार जिल्हा कांग्रेस -नवघर माणिकपूर ब्लॉक)

Post a Comment

0 Comments