भारतीय जनता पार्टी हा “आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या विचारधारेतून देशसेवेचे कार्य करणाऱ्या देशभक्त कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या राष्ट्रनिष्ठ विचारसरणीने प्रेरित होऊन वसई विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
हा भव्य प्रवेश सोहळा दि. 14/10/2025 रोजी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र (दादा) चव्हाण यांच्या हस्ते आणि वसईच्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आज भाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्यांमध्ये –बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक,विशाल नगर रेसीडेन्स असोसिएशचे प्रथम अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विशाल नगर माजी अध्यक्ष, वसई केबल प्रा.लि.चे संचालक श्री. प्रदीपभाई नरसिंग पवार त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीचे नगरप्रमुख, विशाल नगर रेसिडेंसी अध्यक्ष, संचालक ओम साई पतसंस्था मर्या.,भारतीय स्टेट बैंक निवृत्त अधिकारी श्री. नंदकिशोर नरसिंग पवार,नवदुर्गा सार्व. नवरात्रोत्सव युवा अध्यक्ष, दहीहांडी असोसिएशन पालघर जिल्हा उपाध्यक्ष, बहुजन विकास आघाडीचे संघटक श्री.साईराज क. पवार,वसई केबल प्रा.लि संचालक ॲड नैशाद सुभोधचंद्र पारिख,वसई केबल प्रा.लि. संचालक श्री. राजेंद्र चाफेकर,वसई केबल प्रा.लि. संचालक श्री.अमोल पाटील,सार्व. गणेशोत्सव मंडळ विशाल नगर कार्याध्यक्ष व दैनिक चौफेर संघर्ष पेपरचे संपादक श्री.कैलास रांगणेकर,दिव्य मानस पेपर संपादक श्री.सुधिर चौधरी,साप्ताहीक युग प्रवास संपादक श्री.शिवम संतोष मिश्रा,विशाल नगर रेसिडेंसी असोसिएशन सेक्रेटरी श्री.प्रकाश विठ्ठल जाधव,महावीर निधी सेक्रेटरी श्री.महेश पाटील,धर्म जागरण नगर संयोजक श्री.रविंद्र बाबूराव चव्हाण,राष्ट्रीय सैनिक मित्र फाऊंडेशन संस्थापक व महा. पोलीस राज्य संघटना अध्यक्ष श्री.सिध्देश राणे,सार्व.गणेशोत्सव मंडळ विशाल नगर सेक्रेटरी श्री.भार्गव घाडी,चाटर्ड अकाऊंटंट (CA) श्री. प्रमोद के. व्यास,बहुजन विकास आघाडीचे मुख्य कार्यकर्ता श्री.आशिष अ. घाग, बी. कॉम.शिक्षक, श्री.राजेश राठोड, सार्व.गणेशोत्सव मंडळ विशाल नगर कोषाध्यक्ष श्री.अमोल दिपक मालणकर, सोशल मिडीया/जाहीरात श्री.अनिकेत प्रमोद परब, सोशल मिडीया नेटवर्क श्री.जयेश बलराम बंगेरा, बहुजन विकास आघाडी मुख्य युवा कार्यकर्ता, श्री.अमित मायाशंकर पांडे, नवदुर्गा सार्व. नवरात्रोत्सव मंडळ सचिव श्री.रामलू रेडी, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख युवा कार्यकर्ता व्यावसायिक श्री.रमेश टांक, नवदुर्गा सार्व. नवरात्रोत्सव उपाध्यक्ष श्री.ओम प्रकाश पांडे, बहुजन विकास आघाडी मुख्य कार्यकर्ता श्री.प्रविण प्रसन्न पनिकर या सर्वांसह इतर मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला माझ्यासह भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.श्री.रविंद्र चव्हाण साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. विक्रांत पाटील, केरळ प्रकोष्ट महाराष्ट्र संयोजक श्री. उत्तम कुमार, भाजपा वसई-विरार जिल्हा सरचिटणीस श्री. बिजेंद्र कुमार, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री. मॅथ्यू कोलासो, श्री. भूपेश राऊत, श्री. राजेश नायर, श्री. संतोष घाग, श्री. राजू इसाई, श्री. छोटू आनंद, श्री.नितीन ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून, राष्ट्रहित व समाजहितासाठी काम करण्याच्या निर्धाराने वसईतील कार्यकर्त्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला आहे.
“वसईचा विकास आणि जनतेचा सन्मान हेच आमचे ध्येय!” या ब्रीदवाक्याने हे नवे सदस्य पक्ष कार्यात जोमाने योगदान देतील, असा विश्वास आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments