Type Here to Get Search Results !

पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत करा






खासदार डॉ. हेमंत सवरांनी मुख्यमंत्री व पालक मंत्री श्री. गणेश नाईक यांच्या कडे तात्काळ मदतीची केली मागणी 


ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये २७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या चक्रीवादळसदृश अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले असून, त्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड आहे.


यासंदर्भात खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस व पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री मा. श्री. गणेश नाईक यांच्याकडे तात्काळ मदतीसाठी लेखी मागणी केली आहे.


खासदार महोदयांनी त्यांच्या पत्राद्वारे खालील तातडीच्या मागण्या मांडल्या आहेत:

 • तातडीने पंचनामे: ठाणे व पालघर जिल्ह्यांतील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात यावे.

 • आर्थिक मदत व पुनर्वसन: शेतकरी आणि नागरिकांना तातडीने आर्थिक मदत तसेच पुनर्वसनाची सुविधा पुरवावी.

 • आपत्ती व्यवस्थापन निधीचा वापर: आवश्यक तरतुदी करून मदत कार्य जलदगतीने सुरू करावे.

 • आरोग्य व निवारा सुविधा: प्रभावित भागात आरोग्य सुविधा, अन्नपाणी, निवारा व पुनर्वसनासाठी आवश्यक उपाय त्वरित राबवावेत.


या मागण्यांमुळे राज्य प्रशासनाला प्रभावित भागांमध्ये जलद मदत कार्य सुरू करण्यास चालना मिळेल, तसेच शेतकरी व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळू शकेल, असा विश्वास डॉ. सवरांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments