Type Here to Get Search Results !

वसईची संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते मोफत २० एस.टी. बस सेवेचा शुभारंभ

 






गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या वसई मतदारसंघातील चाकरमान्यांसाठी वसईच्या लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार  स्नेहा ताई दुबे पंडित यांनी उपक्रमशील पाऊल उचलत मोफत एस.टी. बस प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली.


            या उपक्रमांतर्गत आज रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी वसईतून एकूण २० एस.टी. बस कोकणासाठी रवाना करण्यात आल्या. या बस सोडण्याचा शुभारंभ आमदार  स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.


या वेळी कार्यक्रमाला भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस  बिजेंद्र कुमार, जिल्हा सचिव नंदकुमार महाजन, वसई रोड मंडळ अध्यक्ष  महेश सरवणकर, मानव दुबे,गोपी मेनन, मयंक सेठ, दीपक शर्मा, संतोष काकड,सिद्धेश तावडे,सुरेश प्रजापती,अपर्णा पाटील,मुकुंद मुळ्ये,मिकी आनंद, संतोष घाग,अंशूमन ठाकूर,अर्जुन इंगोले,अक्षय कदम, नितीन फाटक,सुचिता शेट्टी,मनमित राऊत, देवदत्त मेहेर, प्रतीक चौधरी,मार्कंडेय पांडे,निखिल बाबर,लालजी कनोजिया  व शिवसेनेचे जितेंद्र शिंदे तसेच असंख्य कार्यकर्ते व कोकण प्रवास करणारे चाकरमानी , गाडीचे चालक,वाहक उपस्थित होते.


             या उपक्रमामुळे कोकणवासीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. वसईतील जनतेशी असलेले आत्मीय नाते आणि लोकप्रतिनिधी म्हणून दाखवलेली संवेदनशीलता या माध्यमातून पुन्हा अधोरेखित झाली.


Post a Comment

0 Comments