वसई :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या पॅचवर्क पाहणीदरम्यान रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे २.३५ वाजता आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांनी दत्तानी मॉल परिसराची पाहणी केली. यावेळी मॉलमधील विंग्स ऑन फायर बार व पंखा फास्ट बार येथे मोठा डिजेचा आवाज, तसेच मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून भांडण सुरू असल्याचे दिसून आले.
स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही मध्यरात्री २.३० वाजता हे बार कायदा मोडून सर्रासपणे सुरू असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले.
या संदर्भात आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी बोलावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
“आमचा कोणत्याही व्यवसायाला विरोध नाही, मात्र कायदा मोडून रात्री २.३० नंतर चालणाऱ्या बारविरोधात कारवाईची आमची भूमिका ठाम असेल,” असे आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी स्पष्ट केले.



Post a Comment
0 Comments