Type Here to Get Search Results !

*भाजप राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम यांची राजन नाईक यांच्यासोबत सदिच्छा भेट!*








विरार : नालासोपारा विधानसभा 132चे महायुतीचे उमेदवार राजन नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल झाला. त्यानंतर आज (बुधवार, 6 नोव्हेंबर) भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम यांनी नालासोपारा पश्चिम येथील भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. 


या भेटीत त्यांनी राजन नाईक यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रचारकार्याचा आढावा घेतला. तसेच विधानसभा संयोजक मनोज बारोट यांच्यासोबत प्रचार नियोजनावर चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन केले. 


या प्रसंगी दिव-दमण व दादरा-नगर हवेली एससी मोर्चाचे प्रभारी व भाजपचे माजी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक खरटमल, जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, महामंत्री जे. पी. सिंह, प्रवासी प्रभारी धर्मेश पंड्या, विजय प्रकाश दुबे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनीत तिवारी, महामंत्री योगेश सिंह, महिला मोर्चा शहर अध्यक्ष मालती सिंह, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शाहीन शेख सहित शक्ती केंद्र प्रमुख तसेच बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल मंगळवारी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून राजन नाईक यांच्या प्रचारकामाचा शुभारंभ केलेला होता. 

***

Post a Comment

0 Comments