पालघर दि. 13 : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डहाणू जि. पालघर यांना दिनांक १३/११/२०२४ रोजी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लगतच्या केंद्र शासित प्रदेशातून होणा-या मद्य तस्करीवर आळा घालन्याकरिता विभागातून दिवसरात्र गस्त व करडी नजर ठेवली जात असताना दिनांक १३/११/२०२४ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डहाणू जि. पालघर विभागाचे निरीक्षक सुनिल देशमुख, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, पालघर जि.पालघर विभागाचे निरीक्षक ए.एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक राजेश एस. शिंदे, दुय्यम निरीक्षक विश्वजीत एम. आभाळे, दुय्यम निरीक्षक विकास आबनावे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, ए.एम.शेख, जवान कमलेश पेंदाम यांनी विभागात सापळा रचून कुर्झे ठाकरपाडा रोड, कूर्झे डॅम जवळ ता. तलासरी जि. पालघर येथे मारुती सुझुकी कंपनीची स्विप्ट VXI गाडी क्र. DN-०९ / Q- ०४७३ चा थरारक पाठलाग करून जप्त केलेली आहे गाडीत परराज्यातील अवैध मद्य मिळुन आल्याने त्यांच्या विरुध्द सी.आर.क्र.१७५/२०२४ नुसार गुन्हा नोंदविण्यांत आलेला आहे.
सदर गुन्ह्यात जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १०,५४,९०० इतकी असून संबंधित आरोपी फरार झालेला आहे.
यावेळी १ चारचाकी वाहन जप्त करण्यांत आले .कारवाई डॉ.विजय सुर्यवंशी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे, संचालक (अं.व.द) महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच प्रदिप पवार विभागिय उपायुक्त, कोकण विभाग ठाणे, सुधाकर कदम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पालघर आणि बी.एन. भुतकर उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यांत आली.
सदर गुन्हयाचा तपास विश्वजीत एम. आभाळे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, डहाणू-२, जि. पालघर हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments