विरार - विधानसभा निवडणुका जश्या जवळ येऊ लागल्या आहेत तसे राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कुणावरही टीका करण्यापेक्षा आपण केलेल्या कामांवर आणि विकासावर आपण बोलले पाहिजे असं मत कायम व्यक्त करणाऱ्या आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपण केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी दिली. यामुळे विरोधकांकडून केल्या अपप्रचाराला त्यांनी सणसणीत उत्तरं देत विकासकामांचा पाढाच यावेळी वाचला.
तसेच रोजगार निर्मिती, उद्योगधंदे आणि व्यापारउदीम वाढावा यासाठी मी कायमच प्रयत्न करत आहे हे ही सांगितले. शहरातील अंतर्गत वाहतूक सुधारावी तसेच मुंबईशी वसई-विरार जोडले जावे यासाठी नायगाव ते भाईंदर या दरम्यान पूल बांधणे, ज्यामुळे वाहन प्रवास अधिक सुलभ होईल. यासोबतच विरार पर्यंत मेट्रो आणावी अशी मागणी सुद्धा ठाकूर सातत्याने करत आहेत. वसई-विरार -नालासोपारा या शहरांना जोडणारा रिंगरोड प्रस्तावित आहे तो ही मंजूर झाला आहे. शहरात नव्याने होणारे ७ उड्डाणपूल, भविष्यातील रिंगरोड तसेच मेट्रोचीही मागणी आपण केलेली आहे. अशी माहिती यावेळी हितेंद्र ठाकुरांनी दिली.
नालासोपारा शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येविषयी देखील ते बोलले. नालासोपाऱ्यात सध्याच्या घडीला एकच उड्डाणपूल असल्याने तिथे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच दुसरा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. तसेच विरार पश्चिमेच्या बोळींज येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी विरार पश्चिमेच्या सायन्स गार्डन पासून ते बोळींजपर्यंत फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे त्यामुळे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार आहे.
कामण आणि चिखंडोंगरी येथे होणाऱ्या सबस्टेशमुळे वीज प्रश्न सोडवण्यास मदत -
१८०० करोड महावितरणला देण्यात आलेले असून जिथे पावसामुळे तसेच हवेमुळे केबल तुटण्याच्या घटना घडतात अशा ठिकाणी भूमिगत केबल्स टाकण्यासाठी १८७ करोड मंजूर करून घेण्यात आले आहेत अशीही माहिती यावेळी ठाकुरांनी दिली. त्यामुळे वसई विरार परिसराच्या वीज प्रश्नांवर मोठ्या प्रमाणावर काम होऊन वीज प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.
वसई विरार शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या ठाकुरांनी यावेळी आणखीन काही योजना लवकरच मार्गी लागणार असल्याचे सांगितले त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा आणखीन वाढणार आहे. ते म्हणाले, दहेरजा नदीवरील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी १६५ करोड तसेच सुसरी धरणाच्या योजनेसाठी १६ करोड रुपये वसई विरार शहर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे जमा केले आहेत. खोलासा पाडा १ आणि खोलसा पाडा २ ही धरणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारली जाणार आहेत त्यासाठीही शासनाने मंजुरी दिलेली आहे. या सगळ्या विकासामुळे शहरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे असे ठाकुरांनी यावेळी सांगितले.
गोवर्धन बिहाडे वसई पालघर

Post a Comment
0 Comments