*वसई विधानसभेच्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते पोमण येथे भव्य विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न*
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पोमण येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात ग्रुप ग्रामपंचायत पोमण कार्यालयाचे विस्तारीकरण व नूतनीकरण कार्यालयाचे लोकार्पण तसेच पोमण येथील भव्य समाज मंदिराचे भूमिपूजन मा. आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याशिवाय पोमण, मोरी व शिलोत्तर गावातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी एकूण २२ महत्त्वपूर्ण विकासकामांचे ऑनलाईन लोकार्पणही मा. आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते पार पडले.
या कामांमध्ये प्रमुख कामे पुढीलप्रमाणे :
पोमण ग्राउंड येथे पोडियम बांधकाम
वैयक्तिक लाभ योजनेअंतर्गत साहित्य वाटप
कचरा गाडी खरेदी
पोमण, मोरी व शिलोत्तर येथे नवीन व विकसित स्मशानभूमी बांधकामे
जिल्हा परिषद शाळांमध्ये पटांगणासाठी पेव्हर ब्लॉक बसवणे
मोरी येथे सेल्फी पॉईंट, रूफ टॉप, लाकूड स्टोरेज, प्रतीक्षा शेड व कार्यालय विस्तार कामे
मोरी व शिलोत्तर येथे अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसवणे
ही सर्व कामे स्थानिक नागरिकांच्या सुविधा वाढविणारी, गावांचा विकास वेगवान करणारी आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारी ठरणार आहेत.
यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री. चव्हाण जी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजू म्हात्रे, ग्रुप ग्रामपंचायत पोमणचे सरपंच श्री. आत्माराम ठाकरे, उपसरपंच श्री. दिनेश म्हात्रे, भाजपा वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजू म्हात्रे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.





Post a Comment
0 Comments