भारतीय जनता पार्टी संघटन पर्व प्रभारी आ.रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी वसई परिसरातील उबाठा आणि बहुजन विकास आघाडीच्या सुमारे 300 कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी वसईच्या आमदार स्नेहा पंडित दुबे आदी उपस्थित होते. श्री.चव्हाण यांनी यावेळी सर्वांचे भाजपा मध्ये स्वागत केले. यामध्ये उबाठा रंजित प्रकाश किणी उपविभाग प्रमुख (नायगाव), विभाग प्रमुख नंदकुमार पाटील, प्रविण खंडागळे उपशाखाप्रमुख, हिंदू संगठन वसई पूर्व चे प्रवेश दुबे, बहुजन विकास आघाडी चे मनोज गुप्ता,मिक्की आनंद, दिनेश म्हात्रे, कल्पेश पाटील, प्रमोद रसाल, ज्योती सिंग, कमलेश भोईर यांसह अनेकांनी भाजपा प्रवेश केला.

Post a Comment
0 Comments