पालघर दि १४ ( जिमाका ): नुकत्याच अमरावती, येथे पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्यामधील दोन खेळाडूंनी रौप्य पदक मिळवून देण्याचा मोठा बहुमान महाराष्ट्र राज्याला मिळवून दिला आहे.हरियाणा विरुद्ध महाराष्ट्राचा संघ खेळत असताना ध्रुव मेहरणे, चार गडी बाद केले तर हिमाचल विरुद्ध ऋनीता पाटीलने सात गाडी बाद केले होते.
महाराष्ट्राच्या संघामध्ये पालघर जिल्ह्यातील ह.म.पंडित विद्यालयाची विद्यार्थिनी ऋणिता पाटील व श्रॉफ विद्यालयाचा खेळाडू ध्रुव मेहरणे यांची निवड झाली होती.
या दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्रासाठी उत्तमात उत्तम खेळ करून महाराष्ट्राला रोप्य पदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
त्यांच्या या तुफान खेळी बद्दल पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद गोविंद बोडके यांच्या शुभहस्ते या दोन्ही गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ह.म पंडित विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मधुमती कुलकर्णी,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता पाटील, जिल्हा क्रीडा समन्वयक आशिष पाटील, क्रीडा मार्गदर्शक विशाल पाटील, अमृत घाडगे ,प्रतिश पाटील ,भक्ति अंब्रे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा क्रीड़ा परिषदअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले की
पालघर जिल्ह्यातील खेळाडूंची कामगिरी पाहता, पालघर जिल्हा नक्कीच ऑलिंपिक सरांपर्यंत पोहोचेल याबाबत कोणती शंका नाही. पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना आवश्यक मदत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल

Post a Comment
0 Comments