Type Here to Get Search Results !

वसई विरार शहरात ७ नवे उड्डाणपूल, नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका. २ हजार कोटी इतका निधी मंजूर.

 



वसई - वसई- विरार शहर महानगरपालिकेची वाढती लोकसंख्या आणि रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरात नव्या वाहतूक यंत्रणेची आवश्यकता होती. नुकताच वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी ७ उड्डाणपुल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या उड्डाणपुलाच्या कामांना वेग येणार आहे. सदर कामांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव अशी पश्चिम रेल्वेची तीन स्थानके येतात मात्र पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाण पुलांची संख्या कमी असून त्यामुळे वाहतुकीवर ताण पडत होता. ज्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस अधिक वाहतूक कोंडी होते अशा जागा उड्डाणपुलासाठी निवडण्यात आल्या आहेत जेणेकरून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.


वसई विरार शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे शहरात असलेली वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हे लक्षात घेऊन वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई विरार परिसरातील वाहतूक कोंडीकडे आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या समस्यकडे गंभीरतेने लक्ष घालत वेळोवेळी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता वसई विरार शहरात वाहतूक करणे सुलभ होणार असून यामुळे वेळेची तसेच इंधनाचीही बचत होणार आहे. यामुळे शहराची अंतर्गत वाहतूक सुधारून विकासाला गती मिळणार आहे.


मंजूर झालेले उड्डाणपूल -


१) रेंज ऑफिस, गोखिवरे, वसई (पूर्व )

२) चंदननाका जंक्शन, नालासोपारा (पूर्व)

३) बोळींज खारोडी नाका ते सायन्स गार्डन, (विरार पूर्व )

४) मनवेलपाडा नाका ते फुलपाडा जंक्शन, (विरार पूर्व )

५) माणिकपूर ते बाभोळा नाका, वसई (प)

६) वसंत नगरी ते एव्हरशाईन, गोखिवरे वसई रोड पूर्व

७) नारिंगी (साईनाथ नगर ) विरार.

Post a Comment

0 Comments