Type Here to Get Search Results !

*नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांना महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे!*





*नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील असंख्य बहिणींची अपेक्षा*

*राजन नाईक यांच्या अभिनंदनपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन*

विरार : नालासोपारा विधानसभा मतदारसंघ : 132 चे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांना महायुतीच्या नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा असंख्य लाडक्या बहिणींनी व्यक्त केली आहे. परिवर्तनाच्या या लढाईत पदर खोचून सहभागी झालेल्या असंख्य लाडक्या बहिणींच्या वतीने नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना शुभेच्या देण्यासाठी सोमवार, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नालासोपारा पश्चिम येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात असंख्य बहिणींनी उपस्थिती दर्शवली. 


‘लाडकी बहीण योजने`अंतर्गत मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या अपेक्षेने नाही; तर नालासोपारा शहराच्या परिवर्तनासाठी आम्ही राजन नाईक यांना निवडून दिले आहे. मतदानपूर्व दिवशी विरार येथील विवांता हॉटेलमध्ये घडलेली घटना वसई-विरार शहराच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. या घटनेने शहरातील असंख्य बहिणी आजही असुरक्षित असल्याचे अधोरेखित केले आहे. त्याच बरोबर या शहरातील असंख्य भाऊही असुरक्षिततेच्या छायेखाली आहेत. या सगळ्यांना सुरक्षितता मिळावी, त्यांना निर्भयपणे जगता यावे, यासाठी या शहराला मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. ते या पदाला पूर्णपणे न्याय देतील. नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांच्या निमित्ताने महायुतीचे सरकार पालघर जिल्ह्याला मंत्रीपद बहाल करेल, असा विश्वास या प्रसंगी लाडक्या बहिणींनी व्यक्त केला आहे.


दरम्यान; कार्यक्रमाला उपस्थित असंख्य बहिणींनी राजन नाईक यांना औक्षण करून त्यांच्या आमदार पदावरील निवडणीसाठी अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी आपल्या लाडक्या भावाला शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments