विरार - विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असतानाच आज आगरी कोळी सेनेने बहुजन विकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केल्याने पश्चिम पट्टीत बहुजन विकास आघाडीला बळ मिळाले आहे. वसई ,नालासोपारा आणि बोईसर मतदार संघातील बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देण्यासाठी पालघर जिल्हा अध्यक्ष भुपेश कडुलकर यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत त्यांना पाठींब्याचे पत्र दिले आहे. यावेळी त्यांच्या बरोबर वसई तालुका प्रमुख जयेशवं अनंत पाटील ,विरार तालुका प्रमुख राजू तांडेल ,नागेश काटे,कैलास घरात जितेंद्र वैती ,दिनेश पाटील ,तुषार मानकर भावेश कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. कुणबी सेनेने आपला पाठींबा जाहीर केल्यानंतर आता आगरी कोळी सेनेचा देखील पाठींबा बहुजन विकास आघाडीला मिळाल्याने बहुजन विकास आघाडीची पालघर जिल्ह्यातील ताकद आणखीन वाढणार आहे.

Post a Comment
0 Comments