Type Here to Get Search Results !

*सोशल मीडियावर आरोप करण्यापेक्षा जाहीरपणे समोरासमोर बसावं. आम्ही उत्तरे देऊ. - क्षितिज ठाकुरांचे विरोधकांना आव्हान.*

 



*विरार* - विधासभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच विरोधकांकडून  सत्ताधारी पक्षाचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामीण रुग्णालयांची वाईट अवस्था यावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी ठाकूर यांना जबाबदार धरले आहे. ठाकुरांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत जिल्हा परिषदेकडे वारंवार पत्रव्यहार करूनही जिल्हा परिषदेने शाळा आणि रुग्णालये महापालिकडे हस्तांतरित केली नाहीत. ठाकूर यांनी यावेळी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती देत विरोधकांची बोलती बंद केली आहे. 


सातत्याने मागणी करूनही जिल्हा परिषदेकडून महापलिकेला शाळा हस्तांतरित केल्या जात नाही यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होते आहे. असे सांगतानाच आ. ठाकूर यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. नियम सांगत ठाकूर पुढे म्हणाले की, आचारसंहितेच्या अगोदरही आम्ही पालघर येथे झालेल्या सभेत शाळा महानगरपालिकडे देण्यात याव्यात यासाठी विनंती केली होती. शाळा महापालिकेकडे हस्तांतरित केल्यास आम्ही सुधारणा करून दाखवू असेही ते पुढे म्हणाले. 


सोशल मीडियावर शाळा आणि रुग्णालयांच्या दुरावस्थांचा फोटो व्हायरल केला जात आहे. पण आजही शाळा जिल्हा परिषद आणि रुग्णालये ही शासनाकडे आहेत. ही माहिती देतानाच, "निवडणुक लढवणाऱ्या उमेदवाराला किमान याची माहिती असायला हवी असा टोलाही ठाकुरांनी यावेळी विरोधकांना लगावला. याच वेळी त्यांनी महापालिका रुग्णालयांची माहिती दिली. सध्याच्या घडीला शहरात पालिकेची एकूण ७ रुग्णालये असून नागरिक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. तसेच महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांची एकूण संख्या ६०, ००० इतकी असल्याचे ते म्हणाले. प्रविणा ठाकूर महापौर झाल्यानंतर संपूर्ण पालिका रुग्णालयातील सुविधा आम्ही मोफत पुरवू लागलो. हे सांगतानाच त्यांनी केलेल्या कामांची माहिती यावेळी दिली. 


*आचोळे येथे होणारे मल्टीस्पेशल हॉस्पिटल हे पालघरच्या जिल्हा रुग्णालयापेक्षाही मोठे* 

 

आचोळे येथे होणारे मल्टीस्पेशल हॉस्पिटल हे ४०० बेडचे असणार आहे तर पालघर येथे होणारे हॉस्पिटल हे केवळ २०० बेडचे असणार आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी असलेल्या रुग्णालयाची क्षमता इतकी कमी आहे तर आपल्या नालासोपारा  परिसरासाठी असलेल्या रुग्णालयाची क्षमता जास्त आहे. हे सांगतानाच त्यांनी त्यात कोणकोणत्या सुविधा असणार आहेत याचीही माहिती दिली तसेच ग्रामीण रुग्णालये जर महानगरपालिकेला हस्तांतरित केली तर आपण निश्चितच सुधारणा करून दाखवू असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments