Type Here to Get Search Results !

निशाणी मिळेल ती एका दिवसात कार्यकर्ते घरोघरी पोहोचण्याचा काम करेल- हितेंद्र ठाकूर

 


  

बहुजन विकास आघाडीचे (बविआ) नेते हितेंद्र ठाकूर यांनी विरोधकांवर निवडणूक चिन्ह पळवण्याचा आरोप केला आहे.

 निवडणुकीच्या आखाड्यात बहुजन विकास आघाडीशी लढाई करता येणे शक्य नसल्याने विरोधक परद्याकडून अनेक कटकारस्थान करत असतात बहुजन विकास आघाडीला सिटी हे त्यांचे पारंपारिक चिन्ह मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले आहेत त्याला बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे 

 केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी सिटी हे चिन्ह जनता दल पक्षासाठी राखीव ठेवले आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडी समोर मोठा प्रसंग उभा राहिला आहे 

 त्यामुळे बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे न्यायालयाने ही बहुजन विकास आघाडी ची दखल घेऊन उद्या त्यावर सुनावणी होणार आहे सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 गोवर्धन बिहाडे वसई पालघर

Post a Comment

0 Comments